Share

‘वानखेडेच्या खाजगी सैन्य सदस्याने पत्रकार परिषद घेतली, मात्र मी उद्या सत्य उघड करणार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजपा नेते मोहित कुंबोज यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहित कंबोज आज नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 22 संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं कंबोज यांनी म्हटलं आहे.

तर आता नवाब मलिक यांनी ट्वीट करत सत्य उघड करणार असल्याचे म्हटले आहे. समीर दाऊद वानखेडेच्या खाजगी सैन्याच्या सदस्याने चुकीची दिशाभूल करण्यासाठी आणि सत्यापासून लक्ष वळवण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. मात्र मी उद्या सत्य उघड करणार आहे. असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.

यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अजून एक मोठा आरोप केला आहे. आर्यन खान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. त्यानंतर एक नव्हे तर दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. एक राज्य सरकारने आणि दुसरी केंद्र सरकारने स्थापन केली आहे. आता कोण वानखेडेंचा आणि त्यांच्या खासगी आर्मीचा पर्दाफाश करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, मात्र यावेळी त्यांनी पहिल्यांदाच वानखेडेंवर आर्यन खानच्या अपहरणाचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!