गुरुग्राम : गुरुग्राममध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी नमाजावरून वाद सुरू आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १२ मध्ये नियमितरुपात होत असलेला जुम्याचा नमाज बंद करून याच जागेवर गोवर्धन पूजा करण्यात आली. आता यावरूनच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथं होणाऱ्या नमाजावर आक्षेप घेतला होता.
दरम्यान शुक्रवारी गुरुग्रामच्या सेक्टर १२ मधल्या पार्कात गोवर्धन पूजेचं आयोजन करून जुम्याच्या नमाजावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत नमाज बंद करायला भाग पाडलं. यावरच करायला भाग पाडलं होतं. यावरच असदुद्दीन ओवैसी यांनी आंदोलनकर्ते किती कट्टरतावादी झालेत, हे गुरुग्राममध्ये शुक्रवारी नमाजाला विरोधाचं उदाहरण आहे. हा मुस्लिमांप्रती स्पष्ट द्वेष आहे. आठवड्यातून एकदा १५-२० मिनिटांसाठी जुम्याचा नमाज अदा करणं कुणाच्या भावना कसं दुखावू शकतं? असा सवाल करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Protests against Friday namaz in #Gurgaon are a perfect case of how radicalised these “protesters” have become. It’s plain hatred towards Muslims. How’s practising my faith or offering Jumah namaz once a week for 15-20 mins hurting anyone? @AJEnglishhttps://t.co/ZekLPbJZmb
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 5, 2021
दरम्यान गोवर्धन पूजेच्या वेळी या ठिकाणी मोठ्या संख्येत पोलीस दल तैनात करण्यात आले होते. या पूजेत भाजप नेते कपिल मिश्रादेखील सहभागी झाले होते. ‘रस्ते धार्मिक कार्यक्रमांसाठी नसतात’ असं वक्तव्य यावेळी कपिल मिश्रांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्कॉटलंडवर भारताचा दणदणीत विजय
- भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना जडेजाने सुनावले, म्हणाला..
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे – गोपीचंद पडळकर
- ‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा


