मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर, कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच परिस्थिती नियंत्रणात पावले उचलत आहे.
मात्र, मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोना नियम पळत नसल्याचं दिसून आलं आहे. याचाच परिणाम सद्या रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन दिसत आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असतानाच . महाराष्ट्रात रोज सरासरी 10 हजार नवे रुग्ण कोरोनाच्या विळख्यात येत आहेत व 70-75 जणांचे बळी जात आहेत. याचे खापर राज्यसरकार वर फोडले जात आहे. मात्र केंद्र सरकार घेत असलेल्या सभा पायदळी तुडवत असलेले कोरोनाचे नियम हे यामुळे कोरोन पसरत नाही का असा सवाल करत भाजप वर निशाना साधला आहे.
‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे काय? असे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर लस आली आहे. लोक रांगा लावून लस घेत आहेत. लस आल्यामुळे लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असतानाच महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यात महाराष्ट्राचा आकडा जास्त आहे ही बाब चिंता करण्यासारखीच आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी 10 हजार नवे रुग्ण कोरोनाच्या विळख्यात येत आहेत व 70-75 जणांचे बळी जात आहेत. प्रशासनाने अनेक भागांत अंशतः लॉक डाऊन सुरू केले. ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागांत कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ निर्माण झाले. विदर्भ-मराठवाडय़ातील अनेक भागांत चिंता वाटावी अशा पद्धतीने कोरोना उसळत आहे.
पाच राज्यांत निवडणुका आहेत व प्रत्येक राज्यात वाजतगाजत प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत. बंगालात भाजपास विजयी पताका फडकवायची आहे, पण त्याबाबत निदान पंतप्रधानांनी तरी कोरोनासंदर्भातील वैद्यकीय प्रोटोकॉल पाळायला नको होते काय ? प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय? पंतप्रधान मोदी, अमित शहा, ममता बॅनर्जी, डावे पक्ष यांच्या सभांना, पदयात्रांना ‘मास्क’ वगैरे न लावता, शारीरिक अंतर न पाळता गर्दी होत आहे, पण मुंबईतील लोकल ट्रेन्स, कामधंद्याच्या ठिकाणी गर्दीमुळे कोरोना वाढल्याची माहिती दिली जात आहे. असा प्रश्न आजच्या सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यने ‘कोरोना’ त्यांना स्पर्श करीत नसेल’
- सासऱ्यांच्या ट्विटला जावयाचा भन्नाट रिप्लाय ; सोशलवर ‘हे’ ट्विट ट्रेंड
- पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांसाठी आजपासून ‘मॉक टेस्ट’
- आयसीसी पुरस्कारातही भारताची इंग्लडवर मात; भारतीय खेळाडु सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट
- घाटीतील प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील मंजूर पदे भरण्याची कार्यवाही लवकरच भरणार; देशमुख


