Share

सासऱ्यांच्या ट्विटला जावयाचा भन्नाट रिप्लाय ; सोशलवर ‘हे’ ट्विट ट्रेंड

Published On: 

मुंबई : पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीच्या मुलीचं लवकरच लग्न होणार आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीसोबत शाहिद आफ्रिदीची मुलगी लग्न करणार असल्याचं वृत्त आहे.शाहिन आफ्रिदी लवकरच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे.

पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने आफ्रिदीच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार हे वृत्त दिलं आहे. आफ्रिदीची मुलगी अक्सा आफ्रिदी आणि क्रिकेटपटू शाहिन आफ्रिदी यांचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. “शाहिनच्या लग्नासाठी आम्ही शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबियांना अक्साबाबत विचारणा केली होती”, अशी माहिती शाहिनच्या वडिलांनी स्थानिक माध्यमांना दिली.

याच नात्यांचा उलगडा करणारं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं असता जावयाने सासरा शाहिद आफ्रिदीला थँक्यू लाला म्हणत रिप्लाय दिलाय. शाहीनच्या कुटुंबाने आमच्या कुटुंबाशी संपर्क साधला. दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या संपर्कात आहेत. नात्यांच्या गाठी अल्लाहच्या दारातच बांधल्या जातात. जर अल्लाहची इच्छा असेल तर हे नातेही जुळून येईल. मैदानावर आणि मैदानाबाहेरही यश मिळवण्यासाठी शाहीनबरोबर माझी प्रार्थना आहे, असं ट्विट शाहीद आफ्रिदीने केलं.

शाहिन शाह आफ्रिदीने सासरा शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्विटला छानसा रिप्लाय दिला आहे. आफ्रिदीने ट्विट करुन झाल्यावर काही वेळाने शाहीनने त्याच्या ट्विटला रिप्लाय केला. सासऱ्याला केलेल्या रिप्लायमध्ये जावई शाहीन म्हणतो, थँक्स लाला… आपण माझ्यासाठी दिलेल्या आशीर्वादासाठी आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद. तुम्ही पूर्ण देशाचा गौरव आहात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!