Share

पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांसाठी आजपासून ‘मॉक टेस्ट’

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. द्वितीय व तृतीय वर्षाच्या ऑनलाइन पद्धतीने देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० ते १४ मार्च दरम्यान ऑनलाइन ‘मॉक टेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. सर्व अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरू होणार आहेत. या विद्यार्थ्यांनी १० ते १४ मार्च दरम्यान होणारी ऑनलाइन मॉक टेस्ट देणे गरजेचे आहे.

दरम्यान, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मात्र १ एप्रिलपासून होणार आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!