दुबई : इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्सील (आयसीसी) ने जाहीर केलेल्या फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारामध्ये सलग दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघाचा ऑफस्पिनर आर. अश्विन याने सर्वोत्कृष्ट खेळाडुचा पुरस्कार मिळवला आहे.
आयसीसीने नव्याने जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यातील सर्वेत्तम पुरस्कार जाहिर करण्यास सुरुवात केली आहे. यात जानेवारी महिन्यात भारताचा यष्टिरक्षक- फलंदाज रिषभ पंत याने सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटुचा पुरस्कार पटकावला होता. या पुरस्कारासाठी रिषभ समोर इंग्लड संघाचा आघाडीचा फंलदाज जो रुट आणि आयर्लंडच्या पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान होते.
24 wickets in February ????
A match-defining hundred vs England ????
ICC Men's Player of the Month ✅Congratulations, @ashwinravi99! pic.twitter.com/FXFYyzirzK
— ICC (@ICC) March 9, 2021
तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा भारतीय खेळाडूने बाजी मारली आहे. या महिन्यात भारतीय संघाचा ऑफस्पिनर आर. अश्विनने सर्वोत्कृष्ट खेळाडुचा पुरस्कार मिळवला आहे. फेब्रुवारी महिन्यात अश्विनसह पुरस्काराच्या शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि वेस्ट इंडीजकडून कसोटीत पदार्पण करणारा काएले मेयर्स होते. इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट महिला पुरस्काराची मानकरी ठरली.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे काय ?’
- महसूल बुडाल्या प्रकरणी तहसीलदार सोनींवर कारवाई होणार; आ. दानवेंच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांचे उत्तर
- टी20 सीरीज साठी हार्दिक पंड्याची जय्यत तयारी ; सरावाचा व्हिडीओ व्हायरल
- सचिन तेंडुलकरने केला असा प्रँक की डॉक्टरही घाबरले
- ट्रकखाली चिरडलेल्या मजुरांना न्याय द्या; समृद्धी महामार्गावर कामगारांचे आंदोलन


