मुंबई : द कश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच विवेक अग्निहोत्री दिल्लीच्या दंगलीवर चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नुकतीच विवेक अग्निहोत्रींनी द कश्मीर फाइल्सवरुन होणाऱ्या टीकांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, “मी इथे कोणाला काहीही चुकीचे सांगण्यासाठी किंवा कोणाचा पराभव करण्यासाठी आलो नाही. आम्ही स्वतःचे चित्रपट स्वत: बनवतो. आम्ही बॉलिवूडच्या बाहेर आहोत. खरं तर आपण बॉलिवूडच्या अगदी विरुद्ध आहोत. आम्ही स्वतंत्र चित्रपट निर्माते आहोत. त्यामुळे चित्रपटाची कोणी प्रशंसा केली किंवा नाही याचा मला काहीही फरक पडत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काही प्रभावशाली लोकांना खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण प्रचाराद्वारे माझा चित्रपट खराब करायचा आहे.”
“मला टॅलेंटेड लोकांसोबत क्रिएटिव्ह काम करायचे आहे. जर मी एखाद्या मोठ्या स्टारसोबत काम केले तर मी फार मोठा आहे, असे मानले जाते. पण जर मी तसेच करत नसेल तर मी काहीही करत नाही, अशी समज निर्माण होतो. तू काहीच नाहीस, असे मानले जाते आणि मला फक्त ही मानसिकता मोडून व्यवस्थेला आव्हान द्यायचे होते”, असेही विवेक अग्निहोत्री म्हणाले.
दरम्यान सध्या तुम्ही कोणत्या विषयावर चित्रपटाची निर्मिती करत आहात असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “आम्ही सध्या ‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट बनवत आहोत. ही एक वेबसीरिज असेल. हा चित्रपट दिल्लीत झालेल्या दंगलीवर अवलंबून असेल.
महत्वाच्या बातम्या :
गिरीश बापट यांचा भाजपला घरचा आहेर; ठाकरे सरकारच्या निर्णयाचं केले स्वागत
औरंगाबादच्या क्रीडाधिकारी कविता नावंदेंवर कारवाई कधी? अस्तित्वात नसलेल्या शाळांना मंजूर केलं होतं क्रीडासाहित्य!
‘मिका सिंह’ला हवी आहे कपिल शर्माच्या पत्नीसारखी जीवनसाथी,म्हणाला
“एसटी संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरलं” – अनिल परब
“जगभरात कोरोनाची चौथी लाट…”, राजेश टोपेंचे सूचक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

