🕒 1 min read
औरंगाबाद (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी औरंगाबाद मनपा शाळांच्या क्रीडा साहित्याच्या प्रस्तावामध्ये फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंबंधीच्या तपासात शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले. या प्रस्तावामध्ये मनपा हद्दीमधील मंजूर करण्यात आलेल्या ४३ शाळा आहेत. त्यापैकी अस्तित्वातच नसलेल्या ७ शाळांना हे क्रीडा साहित्य मंजूर केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या घोटाळ्यात सर्व प्रथम मनपा शाळेची यादी तयार करण्यात आली, त्या यादीवर प्रस्ताव न घेता मंजुरी करून घेण्यात आली. नंतर महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रस्ताव मागवण्यात आले. त्यामध्ये मनपा शाळेकडून मागवण्यात आलेल्या क्रीडा सहित्याची यादी न देता जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या सोयीनुसार क्रीडा साहित्याची यादी चिटकावण्यात आली. उदा. चौथीपर्यंत प्राथमिक शाळांना पुरेपूर जागा नसताना क्रिकेटच्या साहित्यामध्ये क्रिकेट मॅट, कबड्डी मॅट असे साहित्य मंजूर करण्यात आले.
कविता नावंदे यांच्यावर आधीही आर्थिक गैरव्यवहाराचा आणि शासनाची दिशाभूल करण्याचा ठपका लागला होता. सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९ तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी असताना नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात आली होती. नावंदे यांच्याविरुद्ध पत्रकार दिगंबर वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशी करण्याबाबत विनंती केली होती. या पत्रामध्ये क्रीडा मार्गदर्शक असताना शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याबद्दल तसेच सातारा जिल्हा येथील स्वयंसिद्धाचे टेंडर स्वतः टाकून शासनाची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले होते.
नावंदे यांना निलंबित करून त्याची चौकशी नि:पक्षपातीपणे करण्यात यावी, अशी मागणी सातारा, अहमदनगर येथील सर्व क्रीडा संघटनामार्फत करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- “किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा” – निलेश राणेंचं आव्हान
- ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्री यांनी सुनावले खडे बोल!
- महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा भीमपराक्रम; मोडला स्वत:चाच ऑलिम्पिक रेकॉर्ड!
- शिवसेना नेते प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त
- “मेव्हणा अडकल्यावर लगेच ते ॲक्टिंव्ह झाले अन…” – निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
