Share

‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्री यांनी सुनावले खडे बोल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळताना दिसत आहे. मात्र काही लोक या चित्रपटाला विरोध करतानाही  दिसत आहे. या चित्रपटामुळे मुस्लिमविरोधी विचारांना खतपणी घातलं जात असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटाला अशाप्रकारे विरोध करणाऱ्यांवर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की त्यांनी एक प्रामाणिक चित्रपट तयार केला आहे. ज्यात इतिहासाची एक काळी,पण सत्य बाजू दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट दहशतवादाचा विरोध करतो. चित्रपट राजकारणावरून प्रेरित असण्याच्या आरोपांवर विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘मी हे दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो की राजकारण ही एक कला आहे.’ चित्रपटाच्या यशाबाबत पल्लवी जोशी म्हणाल्या, ‘हा चित्रपट व्यावसायिक दृष्टीकोनातून तयार करण्यात आला नव्हता. लोक आमच्याकडे येऊन चित्रपटाचं कौतुक करत आहेत. पुढच्या चित्रपटासाठी नव्या कल्पना शेअर करत आहेत. लोक या चित्रपटाशी जोडले जात आहेत हीच आमची पोचपावती आहे.’

विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘मला वाटतं ही मोठी समाजसेवा आहे कारण तुम्ही वाईट आणि चांगल्याचे वर्गीकरण करत आहात. खरं तर, मी वर्गीकरण हा शब्दही वापरणार नाही. मी म्हणेन की या चित्रपटाद्वारे मानवतेचे समर्थन करणारे, मानवी हक्कांचे समर्थन करणारे आणि दहशतवादाच्या व्यवसायात असलेले लोक यांच्यात फरक आहे. जे दहशतवाद्यांचे समर्थन करत होते ते एका बाजूला आहेत आणि आपल्या बाजूला मानवतेचे समर्थन करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. हा चित्रपट २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि हा वर्गीकरण करणारा किंवा फूट पाडणारा चित्रपट आहे असे म्हणणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही. दहशतवाद्यांचे समर्थन करणारे लोक या चित्रपटावर टीका करत आहेत.’ ते पुढे म्हणाले, ‘हा चित्रपट राम आणि रावण यांच्यातील फरक दाखवतो.’ याशिवाय चित्रपटाला विरोध करणाऱ्यांबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘मी दहशतवाद्यांबद्दल का बोलू? त्यापेक्षा मी मानवतेचे समर्थन करणार्‍या लोकांना या दहशतवाद्यांना पराभूत करण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सांगेन.

महत्वाच्या बातम्या :

“मेव्हणा अडकल्यावर लगेच ते ॲक्टिंव्ह झाले अन…” – निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

आमदारांच्या मोफत घरांसंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा; म्हणाले…

Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय

काय सांगता! अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठचे ब्रेकअप! चार वर्षांचं नात संपलं

“आमदार पळून जातील या भीतीनेच…”, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!