अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेले विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विसापूर धरणाचे विधीवत जलपूजन केले. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे कुकडी धरणातील अतिरिक्त पाणी विसापूर धरणात सोडण्यात आल्यामुळे विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणाखालील गावांना उन्हाळ्यात फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विसापूर धरण्याच्या पाण्यावर या भागातील शेती फुलत आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील कारखाने अवलंबून असतात. विसापूर धरणामुळे या भागातील उसाचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे. दरवर्षी परतीच्या पावसापर्यंत धरण भरण्याची वाट पाहावी लागते. यंदा मात्र धरण लवकरच भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंढरकर, माजी उपसभापती गणपतपतदादा काकडे, बाबासाहेब सरोदे, भाऊसाहेब इथापे, धनंजय शिंदे, जब्बार सय्यद, नितीन नलगे, दत्तात्रय पानसरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- के.के.रेंज प्रश्नी शरद पवार व माझे अभिनंदन करण्याऐवजी विरोधक आमच्यावर टिका करतात- निलेश लंके
- पुराव्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याने बेसूटपणे ठेकेदारीच या महाशयांनी सुरू केली, ऊर्जा मंत्र्यांकडे आली आहे ही तक्रा
- अमरावतीतील डॉक्टरांच्या अमूल्य योगदानासाठी पालक मंत्र्यांनीमानले आ
- चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतांचे तात्काळ पंचनामे करण्याचे ‘या’ आमदाराचे निर्देश
- ‘माँ’ तुम्ही आम्हाला पोरकं केलंत ; सुबोध भावे झाले भावुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

