Share

‘ठोकर खाके, आदमी ठाकूर बनता है!’ शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर विरू खुश !

Published On: 

पुणे : भारत आणि इंग्लड संघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंड संघाचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे.

भारतीय संघाची सुरुवात जरी चांगली झाली असली तरी पूर्ण ५० षटक खेळून काढण्यात संघाला अपयश आलं आहे. भारतीय संघाने इंग्लंडला ३२९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात मात्र धक्क्याने झाली. सलामीवीर जेसन रॉय व जॉन बेयरस्टो स्वस्तात माघारी परतले.

यानंतर, बेन स्टोक्स व डेव्हिड मलान यांनी संघाची स्थिती सावरायचा प्रयत्न केला. मात्र, नटराजनने बेन स्टोक्स ला बाद केले. तर, इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी ही कायम ठेवली होती. त्यामुळे सामना अधिक रंजक बनला. तर, शार्दूल ठाकूरने जोस बटलर, मलान आणि लियाम लिविंगस्टन यांचे निर्णायक बळी घेऊन भारतीय संघाची सामन्यांवरील पकड मजबूत केली आहे.

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर खुश होऊन भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु वीरेंद्र सेहवाग याने आपल्या खास शैलीत कौतुक केलं आहे. ‘ठोकर खाकर आदमी ठाकूर बनता है ! शार्दूल ठाकूरचा विजय असो, गेम चेंजर’ असं ट्विट विरुने केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!