पुणे : राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे.
या सर्व प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं असून राज्यात आता नवं सरकार स्थापन व्हावं, अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षात देखील सत्तेत होते. त्यामुळे प्रशासनाबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. पण आता त्यांना कणा नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे. राज्यात नवीन सरकार यावं असं माझं मत आहे,’ असं भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आंबेडकरांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट देखील घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो…’
- चिंताजनक! नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी १६ बळी; १०७३ रुग्ण
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- #COVID19 शी लढा देण्याचा मंत्र ‘दवाई भी कडाई भी’ नक्की लक्षात ठेवा : पंतप्रधान मोदी
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

