मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे संकट सध्या गडद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यातील तापमान देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे.
कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने लागू केलेले कडक निर्बंध नागरिक पाळत नसल्याने मुख्यमंत्र्याने ही भूमिका घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसध्याची परिस्थिती पाहता राज्याला १५ दिवस लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगितले आहे.
तर दुसरीकडे राज्यात आज तापमानाची नोंद पाहिली तर चंद्रपुरात तब्बल ४२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मे मध्ये काय स्थिती असेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जर पुन्हा लॉकडाऊन करायचा असेल तर…; पडळकरांनी दिला सरकारला इशारा
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक


