Share

जडेजाबद्दलचा विराटचा ‘हा’ निर्णय चुकीचा होता ; सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

Published On: 

इंग्लंड : न्यूझीलंड संघ कसोटी क्रिकेटचा पहिला जागतिक विजेता ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडने  ही ट्रॉफी जिंकली. यासामन्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सामन्यासाठी टीम इंडियाने टीम मध्ये आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन स्पिनर्सचा समावेश केला होता. साऊथम्पटनमध्ये सतत पाऊस होत होता. त्याचबरोबर मैदानात गवत देखील होते. त्यामुळे दोन स्पिनर्स खेळवण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सचिननं त्याच्या यूट्यूब चॅनलवरुन टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा बद्दलचा निर्णय चुकल्याचा सांगितला आहे. सचिन म्हणाला, विराट कोहलीचं दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंगचं नियोजन चुकलं. विशेषत: रविंद्र जडेजाला सहाव्या दिवशी कमी ओव्हर्स देणे टीम इंडियाला भारी पडले असे सचिनने सांगितले. “पाच बॉलर्ससह खेळताना सर्वांना समान ओव्हर्स मिळणे अशक्य आहे. कधीही तसं घडणार नाही. पिचची स्थिती, हवेतून मिळाणारी मदत याचा विचार करुन कोणत्या बॉलरला किती ओव्हर्स द्यायच्या याचा विचार करावा लागतो.

पहिल्या इनिंगमध्ये जडेजापेक्षा अश्विनला जास्त ओव्हर देण्याचा निर्णय समजू शकतो कारण त्यावेळी न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सचे फुटमार्क मैदानात तयार झाले होते, पण जडेजा दुसऱ्या इनिंगमध्ये अनलकी ठरला,” असे सचिनने यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!