Share

टीम इंडियातील सिनिअर खेळाडूनं केली विराटची जय शहांकडे तक्रार…

Published On: 

🕒 1 min read

अबुधाबी : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी 20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे टी 20 कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आणि विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 टीमचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली.

विराटने घेतलेल्या या निर्णयानं अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर आता आणखीन एक धक्कादायदायक बातमी भारतीय क्रिकेट वर्तुळातून समोर येत आहे. इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीच्या वागणुकीची टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूनं बीसीसीआयकडं तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतीय संघातील एका सिनिअर खेळाडूने इंग्लंड दौऱ्यात कॅप्टनच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केला असून त्याची बीसीसीआयकडं तक्रार केली आहे. टीम इंडियातील तो सिनिअर खेळाडू आर. अश्विन असल्याची माहिती आली आहे, पण याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत महिती नाही. या खेळाडूनं विराटची तक्रार बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडे केली होती. इंग्लंड दौऱ्यात अश्विनला एकही टेस्ट खेळायला मिळाली नाही. चौथ्या टेस्टमध्ये त्याला खेळवण्यात येईल असं टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी सांगितलं होतं. पण, विराटनं त्यांच्या सूचनेकडंही दुर्लक्ष केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!