पुणे – मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात झाला आहे. इंदोर पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पावणे आठ वाजता ही घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईहून पुण्याला ही रेल्वे निघाली होती, तेंव्हा लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबताना अचानक बोगी घसरल्या. रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी होत्या, त्यात प्रवासी देखील होते. पण थांबविण्याच्या उद्देशाने रेल्वेचे स्पीड कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली.
इंदूर एक्सप्रेस सकाळी सात वाजून ५७ वाजता मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी मागचे दोन डबे (जनरल) रुळावरून घसरले.एक्स्प्रेसचे दोन डबे रूळावरुन घसरल्यानंतर डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. या घटनेमुळं मुंबईहून- पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

