Share

धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक

Published On: 

🕒 1 min read

नाशिक – उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने रविवारी नाशिकमधील एका व्यक्तीला धार्मिक धर्मांतर सिंडिकेट प्रकरणी अटक केली. आतिफ उर्फ उर्फ कुणाल चौधरी याला नाशिकच्या आनंद नगर येथून अटक करण्यात आली. यामुळे आता उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या धर्मांतर रॅकेटचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने रविवार नाशिकमध्ये कारवाई करत नाशिक रोड येथून या संशयिताला अटक केली आहे. तो कुणाल चौधरी या नावानेच परिसरात वास्तव्य करत होता.  परदेशातील वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल 20 कोटी रुपये आतिफ उर्फ कुणालच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पैसे कुठून आले, याचा तपशील उपलब्ध नाही. दहशतवाद विरोधी पथक या बाबत अधिक तपास करत आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात आतिफचा समावेश असल्याचा एटीएसला संशय आहे.

उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिलेल्या माहितीप्रमाणे अतिफ धर्मांतर रॅकेट प्रकरणात मौलाना कलीम सिद्दीकीशी जोडलेला होता. मागील दोन वर्षांपासून तो संपर्कात होता. मौलाना कलीम सिद्दीकीला गेल्या आठवड्यात एटीएसने अटक केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अतिफने रशियातून वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो रशियातून परतला. भारतात वैद्यकीय प्रॅक्टीस केलेली नसल्यानं तो भारतीय वैद्यकीय परिषदेकडून (MCI) घेतल्या जाणाऱ्या परीक्षासाठी तो पात्र ठरला नाही. त्यानंतर अतिफने नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे रुग्णांवर उपचार करणे सुरू केलेलं होतं.अतिफने त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णाचं इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी मन परिवर्तन करण्याचं काम सुरू केलेलं होतं, असा दावा एटीएसकडून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!