Share

‘ठाकरे सरकारच्या ठोकशाहीचा कळस; सोमय्या बोलायला लागल्यावर एवढी का भिती वाटते?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान यावर आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. ‘घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी कोल्हापूरला निघणाऱ्या भाजपा नेते किरिट सोमय्या यांना घरातच पोलिसांनी कैद करुन ठेवलेय,त्यापुर्वी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाला जाण्यासही मज्जाव करण्यात आलाय, हा ठाकरे सरकारच्या ठोकशाहीचा कळसच आहे. सोमय्या बोलायला लागल्यावर एवढी का भिती वाटते?’ असा सवाल देखील शेलार यांनी यावेळी ठाकरे सरकारला केला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकाऊन सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!