Share

‘राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस’, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान

Published On: 

वाराणसी: विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांनी समाज माध्यमावर वादग्रस्त विधान केले आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असलेल्या पाठक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात जो कुणी राणेंचे शिरच्छेद करेल त्याला ५१ लाखांचे बक्षीस देण्यात येणार असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

अरुण पाठक यांनी फेसबुक आणि ट्विटरवर लिहिले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस दिले जाईल. तसेच नारायण राणे यांच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ दिल्या जाणार नाहीत. ते म्हणाले की बाळासाहेबांनीच नारायण राणेंना शिवसैनिक बनवले आणि स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी राणे यांनी बाळासाहेबांच्या मुलावर हल्ला केला. असे ट्वीट त्यांनी केले आहे.

दरम्यान याअगोदरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तर आता पुन्हा एकदा त्यांनी राणेंवरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वाद उफळून आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!