रत्नागिरी – केंदीय मंत्री नारायण राणे यांची बहुचर्चित जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी कोकण सज्ज झाले आहे. मुख्यतः कणकवली हा राणे परिवाराचा बालेकिल्ला आहे. कणकवलीत राणेंच्या होणाऱ्या स्वागताची सर्वांना उत्सुकता आहे.
जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. रात्री राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री शहरात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. शहरात पटवर्धन चौकात रस्त्याच्या बाजूला रात्री गुढ्या उभ्या केल्या गेल्या. मुख्य चौकात आकाश कंदील लावले गेलेत. एकंदरितच कणकवलीतील राणेंचं स्वागत जंगी होणार आणि राणेसमर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपाकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज रत्नागिरीत पार पडणार आहे. दरम्यान, राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली होती. यानंतर शिवसेना भाजप आमने-सामने आल्याचं दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी राणे यांना एक इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंबद्दल जे विधान केलं त्यामुळे आम्ही भडकलो. आम्ही पक्षप्रमुखांच्या विचाराने प्रभावित झालेली मंडळी आहोत. त्यांच्याबद्दल असं विधान कोणीही केलं तरी अरेला कारे आम्ही करणार. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याप्रमाणे भाजपाने ही यात्रा काढली आहे. यात्रा काढावी त्यात काही दुमत नाही. पण यावेळी आमच्या शिवेसनेबद्दल असं वक्तव्य केलं तर शिवसेना सोडणार नाही अशीच भूमिका आहे.
ते पुढे म्हणाले, आज पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरु होत आहे. त्यांनी पूर्ण करावी, त्यावर आमचा काही आक्षेप नाही. पण जर आमच्या शिवसेनेवर, नेत्यांवर, पक्ष प्रमुखांवर काही बोलणार असतील तर नक्की सोडणार नाही. उत्तर देणार ही शिवसेनेची भूमिका असून कालही होती आणि उद्याही राहणार आहे. १०० टक्के अरेला कारे करणार असून करुन दाखवू असं ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत सब स्टेशनजवळ गळती; दोन दिवस औरंगाबादकरांवर जलसंकट!
- ब्रिटनचा ‘तो’ इशारा खरा ठरला; काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील लागू होणार अनुकंपा धोरण
- पुणे शहरात कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये आजही वाढ; तर ४ रुग्णांचा मृत्यू
- ‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

