अफगाणिस्तातान : तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून भारताच्या निर्वासन कारवाई दरम्यान, अफगाणिस्तानच्या रंगीना कारगर या महिला खासदारांकडून दावा करण्यात आला आहे की,’त्यांना २० ऑगस्ट रोजी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हद्दपार करण्यात आले. रंगीन ह्या अफगाणिस्तानमधील फरियाब प्रांताचे प्रतिनिधित्व करतात. कारगरने इस्तंबूलहून भारतात येण्यासाठी विमानाने प्रवास केला होता आणि त्यांना सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी वेळ देण्यात आली होती.
कारगर यांनी सांगितले की,’ त्यांनी वैद्यकीय कारणास्तव २० ऑगस्ट रोजी इस्तंबूल ते दिल्ली प्रवास केला होता, पण त्यांना भारतात निर्वासित म्हणून आलेले नसतानाही विमानतळाबाहेर जाऊ दिले नाही. जर मी माझ्या देशातील बदललेल्या परिस्थितीमुळे आश्रय घेण्यासाठी येत असते, तर त्यांनी मला जाण्याची परवानगी द्यायला हवी होती पण त्यांनी मला उपचारासाठीही जाऊ दिले नाही असे त्या म्हणाल्या.
तसेच सुरक्षा अधिकार्यांनी कारगर यांना सकाळी ६ वाजेपर्यंत दिल्ली विमानतळावर थांबवून ठेवले होते. त्यानंतर कारगर यांना दुबई मार्गाने इस्तंबूलला परत पाठवण्यात आले. यावर त्या म्हणाल्या की,’आमच्याकडे अन्न नव्हते, पाणी नव्हते. मी त्यांना संसद सदस्य असल्याचे सांगितले तेव्हाही त्यांनी मला वाट पाहायला सांगितले. ठेवले. कदाचित कारण परिस्थिती बदलली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव. पण मला भारताला सांगायचे आहे की, आम्ही अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेत येऊ, तेव्हा काय कराल’, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, ‘भारताने अनारकली आणि नरेंद्र सिंह खालसा सारख्या खासदारांना स्वीकारले. परंतु त्यांनी मला स्वीकारले नाही. अशी कृती, भेदभाव आपण या अगोदर कधीच पाहिलेला नाही. ही पहिलीच वेळ होती. त्यांनी आमचे विभाजन केले आहे. ते अफगाणिस्तान हिंदू आणि शिखांना बाहेर काढण्यासाठी खाजगी विमाने पाठवतात पण त्यांनी मला स्वीकारले नाही,’ असेही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत सब स्टेशनजवळ गळती; दोन दिवस औरंगाबादकरांवर जलसंकट!
- ब्रिटनचा ‘तो’ इशारा खरा ठरला; काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील लागू होणार अनुकंपा धोरण
- पुणे शहरात कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये आजही वाढ; तर ४ रुग्णांचा मृत्यू
- ‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’


