इंग्लंड : दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना 18 जुन (शुक्रवारी) रोजी सुरु होणार होता. मात्र पावसाच्या विघ्नाने पहिला दिवस एकही चेंडु न टाकता वाया गेला. अखेर शनिवार पासून हा सामना सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारता आली. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
दरम्यान, टीम इंडियाची सर्वात मोठी समर्थक आर्मी असलेली भारत आर्मी सध्या साऊथम्पटनमध्ये आहे. ही आर्मी सध्या आवडत्या टीमला सपोर्ट करत आहे. त्यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी एक खास गाणं तयार केलं आहे.
https://www.instagram.com/reel/CQTt4jNBJYB/?utm_source=ig_web_copy_link
विराटनं दुसऱ्या दिवशी परिस्थितीनुसार बॅटींग केली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस तो 44 रन काढून नाबाद आहे. शनिवारी भारत आर्मीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये या आर्मीचे सदस्य विराटचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. भारत आर्मीनं ढोल वाजवत हे रॅप साँग तयार केलं आहे जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आयसीसीनं देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हे गाणं शेअर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काल झालेल्या सामन्यात थोडक्यात बचावला पुजारा
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’


