🕒 1 min read
मुंबई : आयपीएलची स्पर्धा स्थगित झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराटने कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
कोविड १९ रिलीफ मदतीसाठी अनुष्का आणि विराट यांनी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू करत आत्तापर्यंत या दोघांनी मिळून 11 कोटी रुपये जमा केले आहेत. त्यांच्या या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.
RCB’s Parent Company Diageo pledges INR 45 Crores to support fight against COVID in India. ????????#PlayBold #WeAreChallengers #1Team1Fight
Read more about this initiative: https://t.co/QwpavBPYr4
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 24, 2021
संपूर्ण देश करोना विषाणूच्या दुसर्या लाटेशी झुंज देत आहे. करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता विराट नेतृत्व करत असेलेल्या आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मालक कंपनीने तब्बल ४५ कोटी देण्याचे वचन दिले आहे.
आरसीबीची मालक कंपनी डिएगोने प्रत्येक राज्यातील एका जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ४५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी २१ शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा निर्णयही घेतला आहे.
- ‘गंगेत प्रेतांचा खच हा राम मंदिराइतकाच महत्त्वाचा मुद्दा’
- धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार! ३१ मे रोजी ‘जागर’ करण्याचे गोपीचंद पडळकरांचे आवाहन
- ‘..तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’, संजय राऊतांची मार्मिक प्रतिक्रिया
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

