Share

दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार

Published On: 

औरंगाबाद : कोरोनानंतर उद्भवणाऱ्या काळ्या बुरशीच्या म्हणजेच म्यूकरमायकोसिस आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. त्यावरील उपचार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

या योजनेची खर्च मर्यादा दीड लाखापर्यंत आहे व उपचाराचा खर्च त्यापेक्षा जास्त होत आहे. मात्र त्यापेक्षा जास्त खर्च झाला तरी तो महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत पात्र ठरवला जाईल, असे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात देण्यात आले. मागील सुनावणीत न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी याबाबत प्रशासनाचे म्हणणे मागवले होते.

राज्यात १८ हजार अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन्स उपलब्ध केली आहेत. अजून १ हजार रुग्णालये या याेजनेतून जोडली जातील. उपचार व शस्त्रक्रियेसाठी नव्या उपचार पद्धतीची रचना केली जात आहे, असेही प्रशासनाने सांगितले. राज्य सरकारने एक पोर्टल तयार करून त्यावर दररोज उपचारासंबंधी व खाटांसंबंधी माहिती उपलब्ध करावी, अशा सूचना खंडपीठाने दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!