इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
विल्यमसनच्या या निर्णयानंतरही टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली निराश झालेला नाही. विराटनं सांगितलं की, ‘ही मोठी फायनल आहे. आम्ही पहिल्यांदा बॅटींग करत रन काढले तर आमच्यासाठी चांगलं आहे. आमच्यासाठी पहिल्यांदा बॅटींग करणे फायदेशीर ठरेल.’ या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट ११ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं. या टीममध्ये आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन स्पिनर्सचा समावेश केला आहे. साऊथम्पटनमध्ये सतत पाऊस होत आहे. त्याचबरोबर मैदानात गवत देखील आहे. त्यामुळे दोन स्पिनर्स खेळवण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विराटनं दोन स्पिनर्स का खेळवले याचं कारण सांगितले. “आमचे दोन्ही स्पिनर्स अनुभवी आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये बॉलिंग करण्याचे कौशल्य आहे. पिचवर थोडा जरी ओलावा असेल तरी त्याचा फायदा उठवण्याची त्यांची क्षमता आहे. दोघेही अचूक लाईन आणि लेंथवर बॉलिंग करतात. आम्ही त्यांचा चांगला वापर करणार आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- गिलला बॉल लागताच सिराजने केले असे काही ; होत आहे कौतुक
- ‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’
- ‘फादर्स डे’ निमित्त सचिनने शेअर केली भावुक पोस्ट
- ‘पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत’, महापौरांचा हल्लाबोल
- इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

