पुणे : शनिवारी ( १९ जून ) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. मात्र, विकेंड लॉकडाऊन अद्यापही कायम असून शनिवार-रविवार पुण्यात केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर निर्बंध कायम आहेत.
मात्र, असे असले तरी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली तुफान गर्दी पाहून राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांना कोरोनाचं गांभीर्य नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांना राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः पायदळी तुडवल्याचे यावेळी पहायला मिळाले
यावर आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली असून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. ‘पुणे शहराने कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना किती हिमतीने आणि कसा केला आहे, याचे थोडेही भान राष्ट्रवादीने ठेवले नाही, हे निषेधार्ह आहे. संकटकाळात योद्धयांप्रमाणे लढणाऱ्या प्रत्येकाचा हा अपमान असून पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत’. असा घणाघात मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
पुणे शहराने कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना किती हिमतीने आणि कसा केला आहे, याचे थोडेही भान राष्ट्रवादीने ठेवले नाही, हे निषेधार्ह आहे. संकटकाळात योद्धयांप्रमाणे लढणाऱ्या प्रत्येकाचा हा अपमान असून पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत. https://t.co/G2eGkzMeEG
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ’, नाना पटोलेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘…म्हणून भाजप नेते शिवसेनेला हिंदुद्रोही ठरवत आहेत, ही एकप्रकारची विकृतीच’
- अंडरटेकरच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर अक्षय कुमारने दिले असे उत्तर म्हणाला
- दुसऱ्या लाटेमुळे देशाचे दोन लाख कोटींचे नुकसान, आरबीआयचा अंदाज
- बांग्लादेशच्या लढ्यात मोदी कोणत्या तुरुंगात होते? पंतप्रधान कार्यालयाने दिले ‘हे’ उत्तर


