Share

इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. पहिल्या डावातील अपयश भारतीय महिलांनी दुसऱ्या डावात झुंजार खेळी करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पहिल्या डावातील 165 धावांच्या आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात भारतीय संघाला लवकर बाद करुन सामना जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न महिला खेळाडुंनी धुळीस मिळवले.

इंग्लंड दौऱ्यातील या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्विकारली. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने 9 गडी गमावत 396 धावांचा डोगंर उभारला. कर्णधार हेदर नाइटने इंग्लंडकडुन सर्वाधिक 95 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तिच्याव्यतीरिक्त सलामीवीर टॅमी ब्युमॉन्ट(66) आणि सोफिया डंक्ले(74*) यांनी पुरेपुर साथ दिली. तर या डावात स्नेह राणाने भारताकडुन सर्वाधीक 4 गडी बाद केले. दिप्ती शर्माने तिला 3 गडी बाद करत चांगली साथ दिली.

इंग्लंडच्या 396 च्या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाच्या सलामीवीरांनी दिडशतकी भागीदारी करत भक्कम सुरुवात करुन दिली. मात्र दोन्ही सलामीवीर स्म्रिती मंधाना(78) आणि शेफाली वर्मा(96) बाद झाल्या आणि भारतीय संघाचा डाव पत्त्याप्रमाणे कोसळला. 1 बाद 167 अशा भक्कम स्थितीतून भारताचा डाव सर्वबाद 231 वर संपुष्टात आला. या डावात पहिलाच कसोटी सामना खेळत असलेली शेफाली वर्माने सर्वाधीक 96 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडुन सोफी इक्लेस्टोनने सर्वाधीक 4 गडी बाद केले.

पहिल्या डावात इंग्लंडला 165 धावांची आघाडी मिळाली आणि इंग्लंडने भारताला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. भारताचा दुसरा डाव लवकर संपवुन सामना जिंकण्याचा इंग्लंडचा हेतु होता. मात्र तसे घडले नाही. भारतीय संघाने दुसऱ्या डावात झुंझार खेळी करत सामना अनिर्णीत राखला. पाचव्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय महिला संघाने 8 गडी गमावत 344 धावांची मजल मारली. इंग्लंडचे चार गड़ी बाद करणाऱ्या स्नेह राणाने या डावात भारताकडुन सर्वाधीक 80 धावांची नाबाद खेळी साकारली. तिच्यापाठोपाठ सलामीवीर शेफाली वर्मा(66) आणि दिप्ती शर्मा (54) यांनी भारताच्या दुसऱ्या डावात मोलाची भूमिका साकारली. तर इंग्लंडकडुन सोफी इक्लेस्टोनने सर्वाधीक 4 गडी बाद केले. दोन्ही डावात अर्धशतक झळकावणाऱ्या शेफाली वर्माला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!