Share

‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा झाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसराच वर्धापन दिन होता. या दिनाचं औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे.

यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही स्वबळाच्या नाऱ्यावरून टार्गेट केलं. ‘अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील,’ असे मत त्यांनी यावेळी बोलताना मांडले.

यावर आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एकमेकांशी लढून, गरळ ओकून, सत्तेसाठी एकत्र आलेल्यांच्या गळ्यात लोक काय हारतुरे घालणार आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधात लढले तर लोक जोड्याने मारतील…भीती खरीय. लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत. फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’. असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!