इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर भारताची स्थिती 30 ओव्हरमध्ये 64/2 अशी होती. दिवसाखेर भारताने किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली.
सामान्यादरम्यान कोहलीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मैदानातील वातावरण थंड असल्याने सर्वच खेळाडूंना थंडीचा सामना करत खेळावे लागले. भारताचा कर्णधार विराटला देखील थंडी मैदानातच कुडकूडू लागला होता. त्याचा हा व्हिडीओ आणि त्यावर शेजारी उभा असलेल्या रोहित शर्माची रिएक्शन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/VSabarish_22/status/1407288239442911239?s=20
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही जेव्हा यष्टीरक्षका शेजारी क्षेत्ररक्षण करत होते. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. ज्यात सर्वात आधी विराट थंडीने कुडकुडताना दिसतो ज्यावर रोहित भन्नाट रिएक्शन देऊन त्याची मजा घेत असल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली


