मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमूळे माध्यमांमध्ये चर्चेत असतं. विराट आणि अनुष्का दोघेही आपल्या करिअरमध्ये टॉपला आहेत. नुकतीच आई झालेल्या अनुष्काने कामातून ब्रेक घेतला असला तरीदेखील श टॉपची अभिनेत्री आहे.
चर्चेत असलेलं हे कपल आता पुन्हा एका कारणामुळे चर्चेत आलं आहे. सध्या विराटची एक मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. मुलाखतीदरम्यान विराट पहिल्यांदा अनुष्काच्या सिनेमांबद्दल बोलला आहे. अनुष्काचा कोणता सिनेमा सर्वाधिक आवडतो, हे त्याने सांगितले आहे.
यावर विराट म्हणाला मला अनुष्काचा ‘ऐ दिल है मुश्किल’ फार आवडतो तिने या चित्रपटात केलेले काम मला जास्त आवडले आहे. मला अनुष्काचे सर्वच चित्रपट आवडतात पण या चित्रपटामधील अभिनय मला फार आवडला आहे. इतका की, आजही फावल्या वेळात तो युट्यूबवर हा सिनेमा बघतो.
एका प्रसिद्ध वहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराट, ‘अनुष्काचा ऐ दिल है मुश्किल माझा आवडता चित्रपट आहे. आजही मी हा सिनेमा बघतो. या सिनेमातील एक सीन तर मी कितीही वेळा पाहू शकतो. अनेकदा मी युट्यूबवर हा सीन बघतो. अनुष्काला कॅन्सर झालेला असतो आणि रणबीर तिला पाहायला जातो, तो सीन मला फार टच करतो. या सीनची माझ्या मनात खास जागा आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’


