Share

विराट कोहलीचा कसोटीत नवा विक्रम; मोहम्मद अझरुद्दीनला टाकले मागे

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (SA vs IND )  यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या कसोटी सामन्यात आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकून त्याने हा विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक नाणेफेक जिंकणारा विराट कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून त्याने 68 व्या कसोटी सामन्यात 30 वा नाणेफेक जिंकली.

विराटने या कसोटी सामन्यापूर्वी  29 नाणेफेक जिंकली होती. तर मोहम्मद अझरुद्दीनने 47 कसोटीत कर्णधार असताना 29 नाणेफेक जिंकली होती. आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या यादीत एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 60 कसोटीत कर्णधार असताना 26 कसोटी सामने जिंकले आहेत.

या सामन्यासाठी भारताने पाच फलंदाजांची निवड केली. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्याऐवजी अजिंक्य रहाणेचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. इशांत शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. यावेळी टीम इंडिया 4 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!