Share

VIDEO : विराट कोहलीनं केली जो रूटच्या ‘त्या’ गोष्टीची नक्कल; मायकेल वॉननं उडवली खिल्ली!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ (IND vs ENG) लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. २३ जूनपासून सुरू झालेल्या या सामन्याचा काल पहिला दिवस होता. भारताचे बहुतांश आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरले पण केएस भरतच्या नाबाद ७० धावांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवशी २४६/८ धावा केल्या. या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवरही होत्या, जो ३३ धावांची इनिंग खेळून बाद झाला. विराटने आपल्या खेळीदरम्यान असे काही केले की सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने इंग्लंडच्या जो रूटच्या एका गोष्टीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला.

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभे राहून, रूटने बॅलन्स करताना त्याची बॅट सोडली होती आणि त्याची बॅट थोडा वेळ जमिनीवर सरळ राहिली होती. नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभा राहून कोहलीही तेच करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. पण त्याने हात काढताच बॅट लगेच त्याच्याकडे झुकली.

https://twitter.com/GemsOfCricket/status/1540007958591197184

जो रूटची कॉपी केल्याबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने एका ट्विटद्वारे विराटची खिल्ली उडवली. तो म्हणाला, की विराट कोहली जो रूटच्या लीगमध्ये नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मागील दौऱ्यातील पाचव्या कसोटीचे वेळापत्रक बदलण्यात आले. हा सामना आता १ ते ५ जुलै दरम्यान खेळवला जाईल. भारतीय संघाने ही कसोटी जिंकली किंवा अनिर्णित राहण्यात यश मिळवले तर हा मालिका विजय संस्मरणीय ठरेल. सध्या भारत २-१ ने आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!