Share

Sanjay Raut : “शिंदे गटाची वेळ निघून गेली”; पवारांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत मतभेदामुळे महाराष्ट्राच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेतील ४६ आमदारांना सोबत घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राऊत म्हणाले कि, त्यांनी चुकीचं पाऊल उचललं आहे. त्यांना आम्ही परत येण्याची संधी दिली. पण आता त्यांची वेळ निघून गेली आहे. आत्ताच आमची शरद पवारांसोबत चर्चा झाली. अनिल देसाई, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

तसेच पुढे राऊत म्हणाले कि, फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिल आहे.

दरम्यान, काल शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ही मागणी केली आहे. शिवसेनेच्या १२ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेय. पहिल्या टप्प्यात १२ नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही सावंत यांनी सांगितलेय.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!