Share

विराट कोहलीचा के एल राहुल संबधी मोठा खुलासा म्हणाला ” आमच्यात कनेक्ट…”

Published On: 

मुंबई: आयपीएलच्या शेवटच्या दोन मोसमात पंजाब किंग्सचे नेतृत्व केल्यानंतर, भारताचा फलंदाज केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्ससोबत कर्णधार म्हणून नवीन प्रवास सुरु करणार आहे. आरसीबीचा भाग राहिलेल्या के एल राहुल बद्दल विराट कोहलीने खुलासा केला आहे. त्याने आरसीबी मध्ये के एल कसा होता याबाबत सांगितले आहे.

राहुलच्या (KL Rahul) प्रवासावर बोलताना विराट (virat kohli)  म्हणाला की “केएल राहुल २०१३ मध्ये करुण नायर आणि मयंक अग्रवालसोबत आरसीबीमध्ये होता. केएल राहुलकडे कधीही टी-२० स्पेशालिस्ट म्हणून पाहिले गेले नव्हते. आरसीबी सोडल्यापासून मी केएलला फारसे पाहिले नव्हते आणि मी ऐकले होते की तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तो आरसीबीमध्ये असताना खूपच लहान होता आणि मी आधीच भारताकडून खेळत होतो आणि आम्ही नियमितपणे आरसीबीसाठी (RCB) खेळत होतो.. त्यामुळे, आम्ही कधीच खूप लवकर कनेक्ट झालो नाही.”

के एल राहुलने याआधी खराब कामगिरीच्या वेळी विराटने साथ दिल्याचे सांगितले होते. विराटनेही यावेळी के एलच्या २०१४ मधील कामगिरी बद्दल सांगितले आहे. “२०१४ मध्ये जेव्हा त्याने कसोटी पदार्पण केले तेव्हा मी त्याला ऑस्ट्रेलियात खेळताना पाहिले होते आणि मला असे वाटले, ‘वाह! त्याने आपल्या खेळावर गंभीरपणे काही काम केले आहे. तो एक अप्रतिम खेळाडू म्हणून परतला आणि त्याने ऑस्ट्रेलियात खूप दमदार सुरुवात केली.त्याच्या देहबोलीने, आत्मविश्वासाने, वागण्याने मी खूप प्रभावित झालो होतो.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!