🕒 1 min read
मुंबई : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. असे असतांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे (Sanjay Tatkare) यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला असून व्हिडिओमध्ये ते म्हणाले आहेत की,’जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले.’
@maha_governor Koshiyari ji… please note correct lesson in history.
@supriya_sule @MumbaiNCP @NCPspeaks pic.twitter.com/8PrUUZqhSw— Sanjay Tatkare | संजय तटकरे (@tatkare_sanjay) February 28, 2022
दरम्यान, चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते.’ तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना नवनीत रणांचे आवाहन
- “…पैकी फक्त ९०० विद्यार्थी परतले; केंद्राने फार मोठा तीर मारला नाही”, वडेट्टीवारांची टीका
- बुमराहने सांगितली मुंबईतील सुरुवातीच्या दिवसाची आठवण म्हणाला “मी पॉंटिंगला …”
- आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर निलेश राणेंचा टोला; म्हणाले,‘मुंबईत बसून काय दिवे लावले…’
- ‘मागासवर्गीय आयोग असताना दूसरा आयोग नेमता येत नाही’ – माजी खासदार हरिभाऊ राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
