Share

बुमराहने सांगितली मुंबईतील सुरुवातीच्या दिवसाची आठवण म्हणाला “मी पॉंटिंगला …”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स (MI) सोबत केली. बुमराहच्या वेगळ्या गोलंदाजी शैलीने आणि चेंडूसह त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघ यशस्वी झाला. स्पर्धेच्या मागील आवृत्तीत, त्याने आयपीएलमधील टॉप-१० सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावले आणि सध्या १०६ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १३० विकेट्स असून तो १० व्या स्थानावर आहे.

भारतीय संघाचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन  (ravi ashwin) यांच्याशी झालेल्या मुलाखतीत , बुमराहने (jasprit bumrah) मुंबई इंडियन्सच्या शिबिरात त्याच्या पहिल्या कॉल-अपवर खुलासा केला. “ मुंबई इंडियन्सच्या (mumbai indians) कॅम्पमध्ये गेलो होतो आणि मी पहिला गेम खेळणार नव्हतो. कारण मी आणि अक्षर पटेल कॅम्पमध्ये उशीरा सहभागी झालो होतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आम्ही खेळत होतो. आम्हाला शिबिरात उशिरा बोलावण्यात आले होते. बंगळुरूला सराव सुरु होता. तिथे सरावाच्या विकेट खूप हिरव्या होत्या आणि २०१३ मध्ये पांढरा चेंडू स्विंग व्हायचा. त्यामुळे मी नवीन चेंडूने गोलंदाजी करत होतो. मी रिकी पाँटिंगला गोलंदाजी करत होतो आणि मी तेव्हा मोठ्या इनस्विंगर्स गोलंदाजी करायचो. मी पॉन्टिंगला दोन-तीन वेळा बाद केलं, तेव्हा त्यांनी माझ्यावर चर्चा केली की ‘याच्यात काहीतरी वेगळं आहे आणि आपण त्याला खेळू देऊ'”

जसप्रीत बुमराहने बोलताना पुढे कबूल केले की तोपर्यंत त्याच्याकडे वेगळी बॉलिंग ऍक्शन आहे असे जाणवले नव्हते. “मला हे समजले नाही की ही ऍक्शन इतकी आकर्षक होती आणि शेवटी, लोकांनी त्याचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली. मला नवीन गोष्टी मिळवण्यात जास्त रस होता. माझ्याकडे इतका मोठा इनस्विंगर आहे पण माझ्याकडे तो आउटस्विंगर नव्हता. लहानपणापासूनच मला सर्व चेंडू टाकता यावेत अशी माझी इच्छा होती. मी लहानपणी त्या सर्व चेंडूंचा आनंद लुटला, मला मोठे षटकार किंवा उच्च-स्कोअरिंग खेळ पाहण्यात कधीच रस नव्हता. मला स्टंप उडणे, लोकांना फटका बस्ताना पाहण्यात रस होता. पण हो, गंभीरपणे फटका बसणे नाही!”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!