Share

विराट कोहलीला मिळाला दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचा पाठिंबा

Published On: 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने (Virat Kohli) अनेक खुलासे केले. या पत्रकार परिषदेत कोहलीने बरेच खुलासे केल्यानंतर क्रिकेट विश्वातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. यातच दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर तबरेझ शम्सीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहली आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या स्वतंत्र वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. सोबतच क्रिकेट विश्वही या मुद्द्यावर दोन गटात विभागताना दिसत आहे. विराट कोहलीच्या या स्फोटक विधानावर अनेक जण टीका करत असतानाच दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर तबरेझ शम्सीने या मुद्द्यावरून त्याचे कौतुक केले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी हा अशा खेळाडूंपैकी एक आहे जो कोहलीच्या दक्षिण आफ्रिकेला जाण्यापुर्वीच्या पत्रकार परिषदेने पूर्णपणे प्रभावित झाला आहे. कोहलीने सौरव गांगुलीने केलेले काही दावे स्पष्टपणे नाकारले. त्याच वेळी, सोशल मीडियावर असे लोक आहेत ज्यांनी बीसीसीआय अध्यक्षांना पाठिंबा देऊन ‘सुरक्षित मार्ग’ न स्वीकारल्याबद्दल विराट कोहलीचे कौतुक केले आहे. शम्सी देखील त्यापैकीच एक आहे.

विराट कोहली आणि बीसीसीआयसोबतच्या ‘कोल्ड वॉर’बद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत, तबरेझ शम्सीने एका चाहत्याने केलेल्या ट्विटचा हवाला दिला, ज्यामध्ये लिहिले होते. ‘विराटसाठी अधिक सुरक्षित पर्याय गांगुलीच्या वक्त्यव्याशी सहमत होणे हा होता. साहजिकच विराट मैदानावर आणि मैदानाबाहेर तसा माणूस नाही. या ट्विटवर टिप्पणी करताना तबरेज शम्सीने लिहिले, ‘म्हणूनच तो तेवढा चागला आहे. जेवढा तो आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!