इंग्लंड : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील दुखापतग्रस्त झाल्यामुळे आगामी कसोटी मालिकेतुन बाहेर पडला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात पृथ्वी शॉची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर चांगलाच वाद सुरु आहे.
निवड समिती आणि भारतीय संघात सुरु असलेला हा वाद चव्हाट्यावर आला आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांची मागणी केली होती. पण, संघात दोन अनुभवी खेळाडू असताना या मागणीनं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. मयांक व लोकेश यांच्यासह बंगालच्या अभिमन्यू इस्वरन हाही संघासोबत राखीव सलामीवीर म्हणून आहे. पण, अनुनभवी खेळाडूला खेळवून टीम इंडिया कोणताच धोका पत्करू शकण्याच्या तयारीत नाही.
यावरच, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यवस्थापनाच्या या निर्णयावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी न निवडलेल्या खेळाडूला बोलवून संघात असलेल्या खेळाडूंचा अपमान करत असल्याची टीका कपिल देव यांनी केली. ते म्हणाले,”याची गरज आहे, असे मला वाटत नाही. निवड समिती सदस्यांचा जरा तरी आदर करा. त्यांनी या दौऱ्यासाठी संघ निवडला आणि शास्त्री व कोहली यांच्या सल्ल्याशिवाय ही संघ निवड नक्कीच झाली नसावी. तुमच्याकडे लोकेश राहुल व मयांक अग्रवाल हे उत्तम सलामीवीर असताना तिसऱ्या पर्यायाची खरंच गरज आहे का? मला हे चुकीचे वाटतेय. विराट व रवी यांनी खेळाडूंच्या पाठिशी उभं राहायला हवं, त्यांचे खच्चीकरण करायला नको.”
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली’, फडणवीसांचा आरोप
- आमदारांवर कारवाई केल्याने विधानभवन परिसरात भाजपची ‘अभिरूप विधानसभा’
- ‘आमदारांना निलंबित करून तुम्ही बालिशपणा केलाय, लढायंच असेल तर या मैदानात!’, निलेश राणेंचे आव्हान
- पुरवणी मागण्या; कोरोनासाठी १४०० कोटी, आमदार निधीसाठी अतिरिक्त ३१० कोटी
- भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
