Share

पुरवणी मागण्या; कोरोनासाठी १४०० कोटी, आमदार निधीसाठी अतिरिक्त ३१० कोटी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात सोमवारी २३ हजार १४९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यापैकी ६ हजार ८९५ कोटींच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या आहेत. या मागण्यांवर आज मंगळवारी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत २०२१-२२ या वर्षासाठी २३ हजार १४९ कोटी ७५ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

या पुरवणी मागणीत सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि सामाजिक न्याय विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या उदय योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात कर्जाच्या परतफेडीसाठी ४ हजार ९६० कोटी, जल जीवन मिशनसाठी ३ हजार ८०० कोटी, तर कोरोनाची औषधे आणि सामग्री खरेदीसाठी १ हजार ४०२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ३१० कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी ४५० कोटी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी प्रत्येकी ४०० कोटींची तरतूद मागणीत आहे. अल्प मुदत सहकारी पतसंरचनेअंतर्गत सक्षमीकरणासाठी अतिरिक्त ३०० कोटी तर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १७५ कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुरवणी मागण्यांची खातेनिहाय तरतूद

१. सार्वजनिक आरोग्य ३ हजार ६४४ कोटी.
२. सार्वजनिक बांधकाम ३ हजार ४० कोटी.
३. पाणीपुरवठा, स्वच्छता ३००० कोटी.
४. सामाजिक न्याय १ हजार ८४३ कोटी.
५. उद्योग, ऊर्जा, कामगार ८५६ कोटी.
६. सहकार, पणन ७६२ कोटी.
७. वैद्यकीय शिक्षण ६२८ कोटी.
८. महिला आणि बालविकास ६२८ कोटी.
९. गृह ३९७ कोटी.
१०. नगरविकास ३२५ कोटी

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!