मुंबई : विधानसभेत गैरवर्तन करणाऱ्या भाजपा आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गैरवर्तन करणाऱ्या १२ आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.
ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश दाखविल्यामुळे आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप लावून निलंबित केले. एक वर्ष काय, ५ वर्ष निलंबित केले तरी त्याची पर्वा नाही. भाजपाच्या एकाही सदस्यांनी शिवी दिली नाही असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय
तर या प्रकारावरून भाजप नेते निलेश राणे यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. ‘आमदारांना निलंबित करून तुम्ही बालिशपणा केलाय, लढायंच असेल मैदानात लढा असे ते म्हणालेत.
विधिमंडळात भारतीय जनता पक्षाचे सदस्य कमी करून जर ठाकरे सरकारला वाटत असेल त्यांनी फार मोठा पराक्रम केला तर तो बालिशपणा ठरेल. लढायचं असेल तर मैदानात लढा, खोटं बोलून मैदान सोडायचे असेल तर काही हरकत नाही. जिथे दिसाल तिथे भारतीय जनता पक्ष तुम्हाला पुरून उरेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 6, 2021
राणे यांनी ट्विट केले आहे की, विधिमंडळात भारतीय जनता पक्षाचे सदस्य कमी करून जर ठाकरे सरकारला वाटत असेल त्यांनी फार मोठा पराक्रम केला तर तो बालिशपणा ठरेल. लढायचं असेल तर मैदानात लढा, खोटं बोलून मैदान सोडायचे असेल तर काही हरकत नाही. जिथे दिसाल तिथे भारतीय जनता पक्ष तुम्हाला पुरून उरेल.
निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या १२ पैकी चौघे माजी कॅबिनेटमंत्री राहिले आहेत. भाजपच्या निलंबित आमदारांनी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन झालेली कारवाई बेकायदा असल्याचे निवेदन दिले.
महत्वाच्या बातम्या
- पुरवणी मागण्या; कोरोनासाठी १४०० कोटी, आमदार निधीसाठी अतिरिक्त ३१० कोटी
- भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन
- आयसीसीच्या आगामी ३ स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय इच्छुक
- ‘लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको हे सरसंघचालकांनी मान्य केलंय’, सामनातून भाजपला टोला
- लग्न झाल्यानंतर धर्म का बदलावा?; आमिरच्या घटस्फोटानंतर कंगनाचं मोठं वक्तव्य

