Share

आमदारांवर कारवाई केल्याने विधानभवन परिसरात भाजपची ‘अभिरूप विधानसभा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल केली. यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यानंतर आता भाजपने आक्रमक पाऊल उचलत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे.

भाजपने कामकाजावर बहिष्कार केला आहे. त्यामुळे भाजपने विधानसभेत जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. विधानमंडळ परिसरात भाजपकडून प्रतिविधानसभा भरवण्यात आली होती. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले होते.

कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत सरकारच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धिक्कार प्रस्ताव मांडला. त्यावर भाजपच्या अनेक आमदारांनी आपली मते मांडली. प्रतिविधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. "शेतकरी, ओबीसी, मराठा, आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला, तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केले. जे घडलेच नाही; ते घडले आहे, असे सांगून धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून आमदारांना निलंबित केले. म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भाजपने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात तक्रार केली. विधिमंडळ परिसरात स्पीकर, माईक लावायला परवानगी कोणी दिली, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. त्यावर त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही, असं उत्तर उपाध्यक्षांनी दिलं होतं. सत्ताधारी आमदारांनीही प्रतिविधानसभेवरुन सवाल उपस्थित केले आहेत. त्यानंतर भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून पदावर बसल्यानंतर प्रतिविधानसभेतले माईक, स्पीकर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तालिका अध्यक्षांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांकडून प्रतिविधानसभेतील स्पीकर काढून घेण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!