मुंबई : भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याने विधानसभेबाहेर अभिरूप विधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली. विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवण्यात आली.
भाजपने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात तक्रार केली. विधिमंडळ परिसरात स्पीकर, माईक लावायला परवानगी कोणी दिली, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर प्रतिविधानसभेतले माईक, स्पीकर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तालिका अध्यक्षांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांकडून प्रतिविधानसभेतील स्पीकर काढून घेण्यात आले.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘खोटे आरोप लावून आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटे बोलणे सुरु आहे. शांतपणे आमचं प्रतिअधिवेशन सुरु असताना मार्शल्स पाठवून, पत्रकारांवर दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे. सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे म्हणून सरकारने आता दडपशाही सुरू आहे. आमचे अधिवेशन तर असेच सुरू राहणार. पण ते पत्रकारांवर दंडुकेशाही करत असतील तर मात्र आम्ही प्रेस रुममध्ये आमचे आंदोलन करू असे फडणवीस यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आमदारांवर कारवाई केल्याने विधानभवन परिसरात भाजपची ‘अभिरूप विधानसभा’
- ‘आमदारांना निलंबित करून तुम्ही बालिशपणा केलाय, लढायंच असेल तर या मैदानात!’, निलेश राणेंचे आव्हान
- पुरवणी मागण्या; कोरोनासाठी १४०० कोटी, आमदार निधीसाठी अतिरिक्त ३१० कोटी
- भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन
- आयसीसीच्या आगामी ३ स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय इच्छुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
