मुंबई : झी मराठी मराठी मनोरंजन क्षेत्रात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत असते. काही दिवसापुर्वीच झी मराठीवर ‘माझा होशील ना’ या नव्या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सई आणि आदित्यची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. काही दिवसापुर्वीच या दोघांचे लग्न पार पडले.
मात्र या मालिकेतील आदित्यचे पात्र साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णीने इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर केलेल्या एका पोस्टमळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत आहे. गोळी लागल्यानंतर आदित्य खाली कोसळतो. तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विराजसने ‘प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थानंची गरज आहे.’ असे लिहीले आहे.
https://www.instagram.com/p/CQdmKarpD2a/
त्याच्या या पोस्टमुळे मालिकेच्या चाहत्यामध्ये खळबळ उडाली आहे. ही पोस्ट म्हणजे त्याचे पात्र मालिकेतुन संपणार तर नाही ना? असा सवाल प्रेक्षकांनी सोशल मीडीयावर विचारला आहे. का तो मालिका सोडत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यादरम्यान मालिकेतील सईची भूमिका साकारणाऱ्या गौतमी देशपांडेनेही गोळी झाडताना फोटो शेअर केला आहे. या फोटोचा आणि विराजसच्या पोस्टचा काय सबंध आहे हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! पराभवानंतरी न्युझीलंडसह बीसीसीआयही झाली मालामाल
- डब्ल्युटीसी फायनल! जेतेपदाने हुलकावणी दिली तरी विराटला चुक मान्य नाही
- डब्ल्युटीसी फायनल! लढवय्या वॅटलींगच्या कारकिर्दीचा गोड ‘दिग्विजया’ने
- ‘भाजपनेच दोन मंत्र्यांना घरी पाठवलंय, त्याचाच धसका या ठाकरे सरकारने घेतलाय’
- वॉटर ग्रीड योजनेस पैठण तालुक्यातून होणार सुरुवात, आ. संदीपान भुमरेंच्या प्रयत्नांना यश!


