Share

‘भाजपनेच दोन मंत्र्यांना घरी पाठवलंय, त्याचाच धसका या ठाकरे सरकारने घेतलाय’

Published On: 

मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. कोरोनाच कारण देत सरकारने केवळ ५ व ६ जुलै रोजी केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. आता अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी राज्यातील प्रश्न मांडून रणनीती आखण्यासाठी आज भाजपची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. ‘सातत्याने आंदोलन करून भाजपाने सरकारवर विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवण्याची भूमिका समर्थपणे बजावली. भाजपाच्या दबाबामुळेच दोन मंत्र्यांना घरी पाठविण्यात आले, त्या अधिवेशनाचा धसका घेऊन ठाकरे सरकारने आगामी अधिवेशन हे केवळ दोन दिवसाचे आयोजित केलं आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा !

सचिन वाझेनंतर परमबीर सिंग यांनी देखील लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील व्यक्तीचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. यानंतर, भाजपने अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मांडला गेला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!