उस्मानाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झाला नसून तरी देखील नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे येथील काही दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कृषी सेवा केंद्रांसह ट्रॅक्टर, बांबू, इलेक्ट्रिकल्स, विद्युत पंप आदी दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. पालिकेने अचानक केलेल्या या कारवाईने एकाच खळबळ उडाली. पालिकेने ३२ दुकानदारांना नोटीसा बजावल्या असून, दुकाने सील करण्याचा इशारा देखील देण्यात आला.
आगामी पावसाळा आणि पेरणी च्या पार्श्वभूमीवर खते व बी बियाणांचा दुकानात शेतकर्यांची खरेदी साठी प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने नगर पालिकेने अशा दुकानदारांना नोटीसा बजावल्या असून तातडीने उपाययोजना न केल्यास दुकान सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (दि.२६) नगर पालिका कर्मचाऱ्यांनी शहराच्या विविध भागातून रॅली काढत उल्लंघन करणाऱ्या ४ जणांवर कारवाई करत १९०० रूपये दंड वसूल करण्यात आला.
कृषी सेवा केंद्र, ट्रॅक्टर, इलेक्ट्रिल, पाईप आदी दुकानांत सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी, मास्क, सोशल डिस्टन्सिगच्या नियमाचे पालन करावे आदी सूचना पालिकेने केल्या आहेत. या शिवाय दुकानातील कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी कोरोना चाचणी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या जरी कमी होयत असली तरी मृत्यू दर मात्र कायम असल्याने अजूनही कोरोनाचे संकट गेले नाहीये. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन येथील प्रशासन करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नुकसानीचे प्रमाण पाहता राज्य सरकारने जाहीर केलेली मदत कोकणवासियांची क्रूर थट्टा करणारी आहे’
- ‘देशाला वाचवायचे असेल तर नोटा छापण्याची हीच ती वेळ !’
- ‘कोरोना काळात अपयशी ठरलेल्या मोदींना माफी मागण्यासाठी सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त नाही’
- कोरोना संकटात आता पठाण बंधू ऑक्सिजन संचही देतायेत मोफत
- ‘पोलिसांनी या मोर्चाला आडकाठी न करता सहकार्य करावे’ – आ. मेटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

