Share

‘देशाला वाचवायचे असेल तर नोटा छापण्याची हीच ती वेळ !’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या काळात मोठं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांवर आर्थिक संकट ओढवल आहे. या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे लोक बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे सामान्य लोकांनासह अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर आता नोटा छापण्याची गरज आहे असे मत भारतीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी व्यक्त केले आहे.

कोटक महिंद्रा बँकेचे संचालक असलेल्या उदय कोटक यांनी देशाच्या अर्थव्यवस्थे विषयी चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना, ‘केंद्र सरकारने या करोना संकटाचा सामना करण्यासाठी तळागाळातील लोकांना थेट मदत करणं आवश्यक आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या वाचवायला हव्यात. सरकारने गरिबांच्या हातात पैसे द्यावेत. यावर जीडीपीचा १ टक्का खर्च करावा लागेल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच ‘सरकारने व्यावसायिक सुधारणा करण्याचा विचार करावा. व्यवसाय दोन प्रकारचे आहेत. पहिले महामारीमुळे ज्या क्षेत्रात बदल आवश्यक आहे तो आणि दुसरा म्हणजे ज्यांचे व्यावसायिक मॉडेल बदलल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. त्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येकाला मदत करणे गरजेचे आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी जेणेकरून अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही.’ असेही उदय कोटक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!