मुंबई : आज २८ मे म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. सावरकर यांना देशभक्त, साहित्यिक, कवी, समाजसुधारक आदी रूपांनी ओळखले जाते. मात्र, या महापुरुषाला देशातील एका गटाने कायमच हिणवलं आहे. स्वातंत्र्यकाळातील फक्त नेत्यांचीच नाही तर प्रत्येक स्वातंत्र्यसेनानी बाबत देशातील जनतेला अभिमान व त्यांच्याबाबत आदर असायला हवा. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काही गट त्यांना आदर न देता त्यांच्या दूरदृष्टीची हेटाळणी केल्याचे दिसून येते.
दरम्यान, आज त्यांच्या जयंती निमित्त अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. तर, राज्याच्या मंत्रीपदी विराजमान असलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मात्र वादग्रस्त विधान केलं आहे. संवैधानिक पदावर विराजमान असलेल्या नितीन राऊत यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल मा. पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही.
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) May 28, 2021
कोरोनाची दुसरी लाट वेळीच आटोक्यात आणण्यात देशाला अपयश आलं. यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण निर्माण झाला आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना त्यांनी एक ट्विट केलं आहे. ‘कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल मा. पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही,’ असं वादग्रस्त विधान नितीन राऊत यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल
- अश्विनने आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर केला खुलासा ; झोपेशिवाय 8-9 दिवस खेळला सामने
- बीडमध्ये कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ!
- अकरावीचे प्रवेश कसे होणार ? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- “काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ जास्त”


