🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.
देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत माजी खेळाडू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. तसंच ‘गरजूंना मदत करणं आमचं कर्तव्य’ असल्याचंही त्यांनी अधोरेकित केलं आहे. दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. तसंच रुग्णांनाही त्रासाला आणि मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
https://www.instagram.com/p/CONOnQtn4y6/?utm_source=ig_web_copy_link
त्यामुळे दिल्लीतील कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन पुरवत आहेत. आता तर त्यांनी वडोदरा येथे ज्यांना ऑक्सिजन संच हवा आहे त्यांनाही तो मोफत देत आहेत. Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा ते आता मोफत ऑक्सिजन संचही देणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल
- अश्विनने आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर केला खुलासा ; झोपेशिवाय 8-9 दिवस खेळला सामने
- बीडमध्ये कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ!
- अभिनेत्री झरीन खानच्या आईची तब्येत ढासळली; प्रार्थना करण्याचं केले आवाहान
- “काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ जास्त”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
