बीड: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शहरात आ. विनायक मेटे यांच्या पुढाकाराने मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की प्रशासनाची परवानगी असो किंवा नसो मोर्चा निघणारच. मात्र आतापासूनच काही पोलीस मराठा तरुणांना त्रास देत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आ. मेटे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली तसेच संघर्ष मोर्चात पोलिसांची आडकाठी नको म्हणत त्यांनी निवेदन देखील दिले आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा ५ जून रोजी निघणार आहे. शिवसंग्रामचे आमदार मेटे यांनी या मोर्चासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पाठिंब्याने हा मोर्चा निघत असून कोणताही राजकीय पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून आपण सोबत असल्याचे मेटेंनी स्पष्ट केले होते. शिवाय, मराठा आरक्षणासाठीच्या सर्व आंदोलनांना क्रांती मोर्चाने पाठिंबा दिलेला आहे.
५ जूनच्या या मोर्चाची तयारी केली जात असून डझनभर समित्या यासाठी तयार केल्या आहेत. परवानगी द्या अथवा नका देऊ, मात्र मोर्चा निघणार, अशी भूमिका संयोजकांनी घेतली आहे. दरम्यान, मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिस मराठा समाजातील तरुणांना त्रास देत असल्याचा आरोप मेटेंनी केला आहे. गुरुवारी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबईत भेट घेतली. पोलिसांनी या मोर्चाला आडकाठी न आणता सहकार्य करावे. या मोर्चात कोरोनाविषयक नियमांचे पालन केले जाईल याबाबत त्यांनी वळसे पाटील यांना खात्री दिली.
महत्वाच्या बातम्या
- अकरावीचे प्रवेश कसे होणार ? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- अंबाजोगाई येथील धक्कादायक प्रकार! कोविड केअर सेंटरमध्ये ‘ब्रदर’नेच केला नर्सचा विनयभंग
- पदोन्नतीतील आरक्षणासाठी रामदास आठवले करणार राज्यभर आंदोलन
- ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये ‘या’ कारणामुळे दिसणार नाही अभिनेत्री उषा नाडकर्णी
- मुक्काम पोस्ट पिंपरी चिंचवड, धोनीचा नवा पत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

