Share

कोरोना नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात, सरपंचाला १० हजारांचा दंड

Published On: 

🕒 1 min read

लातूर: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक कायदे लागू केले असताना, सरपंचाकडूनच नियम पायदळी तुडवल्यावर काय होते, याचा प्रत्यय चाकूर तालुक्यात आला आहे. सरपंचानी आपल्या पुतणीच्या विवाह समारंभात ५० हून अधिक व्यक्तींना आमंत्रित केल्याने, त्यांना दहा हजारांचा दंड भरावा लागला आहे. शंकर मोरगे असे या सरपंचाचे नाव आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून नव-नवे नियम लादले जात आहेत. सध्या दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. असे असताना चाकूर तालुक्यातील मांडुरकी येथील सरपंच शंकर मोरगे यांनी नियमांचे उल्लंघन करत, आपल्या पुतणीच्या लग्णात ५० हुन अधिक व्यक्तींना आमंत्रित केले. त्यामुळे या विवाह समारंभात नियमांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, तलाठी एम. के. पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत सरपंचाना १० हजारांचा दंड ठोठावला. सरपंच शंकर मोरगे यांनी त्यांच्या पुतणीच्या विवाह प्रसंगी नियमांची अंमलबजावणी केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक रमाकांत तोगरगे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!